गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 30 जानेवारी 2021 (22:11 IST)

सायबरसेलमध्ये तक्रार दाखल, ‘मंत्रा’ बदलणार लोगो

Myntra to change logo after woman files complaint
प्रसिद्ध ई-कामर्स वेबसाईट ‘मंत्रा’ने आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी हा लोगो आक्षेपार्ह असल्याचा आरोप केला होता. याबाबत सायबरसेलमध्ये तक्रार दाखल केली गेली होती. या तक्रारीनंतर कंपनीने लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
 
एका मीडिया हाऊसच्या माहितीप्रमाणे मुंबई स्थित स्त्रीवादी कार्यकर्त्या नाझ पटेल यांनी गेल्या वर्षी डिसेंबर २०२० मध्ये सायबर सेलमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. मंत्राचा लोगो नग्न महिलेच्या प्रतिमेप्रमाणे दिसत असल्याचा आरोप करत त्याने मंत्राने आपला लोगो बदलावा असं म्हटलं होतं. 
 
सायबर सेलने या संदर्भात ई-कॉमर्स कंपनीला ई-मेलद्वारे कळवले. त्यानंतर मंत्राने महिन्याभरात नवा लोगो वापरण्यात येईल असं आश्वासनं दिलं आहे.