सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (15:28 IST)

महत्त्वाची बातमी: 1 फेब्रुवारी पासून हे नियम बदलतील, काय होणार महाग जाणून घ्या

जानेवारीचा महिना संपून आता फेब्रुवारी लागणार आहे. फेब्रुवारी 2021 सह अनेक नियमात बदल होतील. सर्वात विशेष म्हणजे 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचं Union Budget 2021 प्रस्तुत होणार आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प प्रस्तुत करणार आणि यात काय अशा काही घोषणा होतील ज्याचा प्रभाव आपल्या कमाई आणि सेव्हिंगवर पडणार.
 
1 फेब्रुवारी बदलणार गॅस सिलंडरच्या किमती
LPG Gas Cylinder च्या किमतती बदल होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करतात. अशात 1 फेब्रुवारी 2021 ला सिलेंडरच्या बदलेल्या किमती लागू होतील.
 
1 फेब्रुवारीपासून ATM हून कॅश काढता येणार नाही
जर आपले खाते पंजाब नेशनल बँकेत असेल तर ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेने एटीएम हून कॅश काढण्याच्या नियमात बदल केला आह. नवीन बदल 1 फेब्रुवारीपासून लागू होईल. पीएनबी ग्राहक विना ईएमव्ही एटीएम मशीनीतून पैसे काढू शकणार नाही.
 
1 फेब्रुवारीपासून बदलू शकता या प्रॉडक्ट्सच्या किमती
1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प प्रस्तुत केले जाणार असून सरकार बजेट मध्ये अनेक वस्तूंवर सीमा शुल्कमध्ये कपता करु शकते. अशात अनके उत्पादनांच्या किमतीत बदल होऊ शकतात. आयात शुल्कमध्ये कपता झाल्यास अनेक वस्तूंची किमत कमी होऊ शकते. तसेच व्यापार्‍यांना राहत मिळू शकते.