शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (20:08 IST)

बातमी महत्वाची : १० आणि १२ च्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची दरवर्षी ऑक्टोबरमध्ये परीक्षा होते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 
 
पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यावेळी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन दहावी-बारावीच्या एटीकेटीच्या परीक्षांचा निर्णय घेण्यात येणार आहे. 
 
याआधी राज्यामध्ये कोरोनाचा प्रसार वाढण्याआधीच बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्या होत्या. तर कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोलाचा पेपर होऊ शकला नाही. कोरोना नियंत्रणात येत नसल्यामुळे अखेर दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना भुगोलाचे सरासरी मार्क देण्यात आले.