शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (23:22 IST)

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील स्थगितीत वाढ

Increase in suspension on international flights
भारतातून परदेशात जाणाऱ्या व्यावसायिक विमान उड्डाणांवरील स्थगिती पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे, डीजीसीएने याची घोषणा केली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत ही उड्डाणं बंद असतील असं डीजीसीएनं निर्णयात म्हटलं आहे.
 
डीजीसीएनं म्हटलं की, "काही निवडक मार्गांवरच विशेष कारणासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सक्षम प्राधिकाऱ्यांच्यामार्फत परवानगी दिली जाऊ शकते. ताज्या निर्णायाचा आंतरराष्ट्रीय विमान वाहतुक आणि त्यांच्यासाठी मंजूर उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नाही. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 28 फेब्रुवारीपर्यंत स्थिगिती देण्यात आली आहे."