शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (20:27 IST)

आंगणेवाडीची यात्रा भाविकांसाठी रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भराडीदेवीची यात्रा म्हणजे आंगणेवाडीची यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी भाविकांना न येण्याचं आवाहन केलं आहे.अंगणवाडीच्या जत्रेची ६ मार्च निश्चित झाली आहे. मात्र यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. यात्रेला भाविकांनी न येण्याचं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' च्या धर्तीवर 'माझी जत्रा माझी जबाबदारी' असं अभियान जत्रेत राबवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.   
 
भराडीदेवी यात्रा भाविकांसाठी रद्द केली असली तरीही धार्मिक कार्यक्रम दोन दिवस सुरू राहणार आहेत.  धार्मिक कार्य कसं करायचं यावर तिथल्या मंडळाची उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली आहे. 
 
'यावर्षी आंगणेवाडीची जत्रा साध्यापद्धतीने साजरी केला जाणार आहे.  कोरोनाचा धोका टळलेला नाही.  यंदाची यात्री ही आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आंगणेवाडी विकास मंडळाचे भास्कर आंगणे यांनी दिली आहे. आम्ही यात्रेकरूना नम्र विनंती करतो त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, असं ही यावेळी भास्कर आंगणे म्हणाले.