मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (19:14 IST)

NZ दौरा : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या कर्णधार

Team India For New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी: टी-20 वर्ल्ड कप 2022 नंतर टीम इंडियाला न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यासाठीचा संघ बीसीसीआयने सोमवारी (31 ऑक्टोबर) जाहीर केला आहे. भारताला न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर टी-20 संघाची कमान हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. वनडे संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे असेल.
 
 टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया: हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (डब्ल्यूके), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, के. यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
 
 वनडे मालिकेसाठी टीम इंडिया: शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक

Edited by : Smita Joshi