मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (09:04 IST)

जादू टोना केला म्हणून भारताने वर्ल्डकप जिंकला

हरलेला काय आरोप करेल याचा नेम नाही. असाच प्रकार भारतासोबत घडला आहे. आपला शत्रूराष्ट्र पाकीस्थान ने पुन्हा एका गरळ ओकली आहे.आपल्या देशाने अंडर १९ वर्ल्ड कपवर भारतानं चौथ्यांदा नाव कोरलं गेले. तर आपल्या देशाने  फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे. तर पुढे सेमी फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानला चांगलीच धूळ चारली आहे. त्यामुळे हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भारताच्या या विजयावर पाकिस्तानी टीमचा मॅनेजर आणि माजी क्रिकेटपटू नदीम खाननं फारच मूर्ख आणि  हास्यास्पद दावा केला आहे. भारत हा  जादू-टोण्यामुळे विजयी  झाला असे  नदीम म्हणाला आहे. जेव्हा भारताविरुद्धचा सामना रोमांचक होईल, असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. पण पाकिस्तानी टीम ५९ रन्सवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे  मला वाटतं की भारताने  टीमवर काळी जादू केली आहे. त्यामुळे जेव्हा खेळ सुरु होता तेव्हा  मैदानात काय चाललं आहे हेच आमच्या बॅट्समनना कळत नव्हतं, असा रडीचा डाव नदीम खान रडला आहे.  नदीम खान हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोईन खानचा भाऊ आहे. नदीम १९९९च्या भारत दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानी टीमचा भाग होता. त्यामुळे सोशल मिडीयावर तो चांगलाच ट्रोल झाला.