गुरूवार, 25 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 1 फेब्रुवारी 2018 (08:59 IST)

हरभजन सिंह झाला ' ट्रोल '

harbhajan singh
भारतीय क्रिकेटर हरभजन सिंहने ट्विटरवर जवानांसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. याच फोटोमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. हरभजन सिंगने सीआरपीएफ जवानांसोबतचा फोटो पोस्ट करताना त्यांचा उल्लेख भारतीय लष्कर असा केला. त्याने लिहिलं होतं की, 'माझ्या भावांसोबत, इंडियन आर्मी, जय हिंद!'. हरभजन सिंगच्या या पोस्टनंतर लोकांनी त्याची खिल्ली उडवत भारतीय लष्कर जवान आणि निमलष्करी दलातील जवानांमधील फरक सांगण्यास सुरुवात केली.  
 
एका युजरने ट्विट केलं की, 'तुम्ही जवानांना प्रेरणा देत आहात याचा आनंद आहे. पण तुमचा आदर राखत मी सांगू इच्छितो की हे निमलष्करी दलाचे जवान आहेत, भारतीय लष्कराचे नाही. कृपया भारतीय लष्कराला जितकं महत्व दिलं जात, तितकंच महत्व निमलष्करी दलाला द्यावं. हे जवान खूप मेहनत करतात आणि सर्व श्रेय भारतीय लष्कराला दिलं जातं'. हरभजनने पोस्ट केलेल्या फोटोवरुन अनेक युजर्स अशाच प्रकारच्या कमेंट करत आहेत.