1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 जानेवारी 2018 (09:35 IST)

देशात 'वंशाला दिवाच हवा' ही समजूत कायम

vanshacha diva

भारतात अजूनही पारंपरिक पद्धतीनुसार वंशाला दिवाच हवा या समजुतीतून मुलगा होईपर्यंत मुली होऊ दिल्या जातात. या अशा मानसिकतेतून देशात २ कोटी १० लाख मुली 'नकुशा' असल्याचे सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

लिंग निवडीला कायद्याने बंदी असली तरी  मुलींना गर्भातच मारले जाते, आजही अवैधरित्या सोनोग्राफी टेस्ट घेऊन मुलगी नाकारण्याचे प्रमाण मोठे आहे. भारतात १००० पैंकी ९४० महिला आजही याप्रकारची तपासणी घेऊन गर्भपात करून घेत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येते. बऱ्याच कुटुंबात पहिला मुलगा जन्मल्यानंतर लगेचच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली जाते. मुलगी झाल्यानंतर मात्र अशी शस्त्रक्रिया केली जात नाही, मुलगा होण्याची वाट पाहिली जाते.