मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

विनोद कांबळी पुन्हा मैदानात, सचिनचा सल्ला

Vinod Kambli credits Sachin Tendulkar for bringing him back on field
होय क्रिकेटमधील सचिन तेंडूलकरचा मित्र विनोद कांबळी पुन्हा एकदा मैदानावर येत आहे. सचिन आणि विनोदची जोडी आजही क्रिकेट रसिकांना आवर्जून लक्षात आहेत. सचिन आणि विनोद या जोडीनं शालेय क्रिकेट स्पर्धेपासून सोबत  आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत बरेच विक्रम केले आहेत.  सचिनचा क्रिकेट प्रवास प्रदीर्घ राहिला आहे मात्र  विनोदचं क्रिकेट करिअर फारसं पुढे गेले नाही. मात्र आता विनोद पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परत येत आहे. यासाठी विनोदनं आपला बालपणीचा मित्र सचिनचे आभारही मानले असून तो म्हणतो की  क्रिकेटच्या मैदानावर मी खेळाडू नाही तर कोच म्हणून परतणार आहे. मी हा निर्णय सचिनच्या सल्ल्यानुसार घेतला आहे. त्यामुळे आता विनोद कांबळी चांगले खेळाडू घडवताना दिसणार आहे. 
 
विनोद बोलतोय की,  "मी समालोचक किंवा टीव्हीवर क्रिकेट एक्सपर्ट म्हणून जात होतो जेव्हा मी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती. मात्र क्रिकेटविषयी माझं प्रेम कायम होतंच . म्हणून आता मी मैदानावर परतत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी परिसरातील एका क्रिकेट कोचिंग अकादमीच्या लाँचिंग सोहळ्याला विनोद कांबळी उपस्थित होता. त्याचवेळी त्यानं ही घोषणा केली. या अकादमीमध्ये तो प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणार आहे.त्यामुळे आता विनोद सोबत सचिन सुद्धा दिसेल अशी आशा आहे.