शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 11 जानेवारी 2023 (12:42 IST)

Prithvi Shaw पृथ्वी शॉचा ट्रीपल धमाका

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने आसामविरुद्ध ऐतिहासिक खेळी केली होती. 383 चेंडूत 379 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळून शॉ बाद झाला. 49 चौकार आणि चार षटकार मारणाऱ्या शॉच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.
 
तो रणजीमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. बीबी निंबाळकर (443*) यांनी रणजीमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळी खेळली आहेत.
 
शॉच्या नावावर मोठा विक्रम
या तिहेरी शतकासह पृथ्वीने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक, विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.
शॉने कर्णधार अजिंक्य रहाणे (131*) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 401 धावांची मोठी भागीदारी केली. वृत्त लिहेपर्यंत मुंबईने 598/3 धावा केल्या आहेत.