सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 23 जून 2022 (16:00 IST)

मध्यप्रदेश विरुद्ध रणजी फायनल : पहिल्या दिवसअखेर मुंबई 5 बाद 248,

बेंगळूर : पृथ्वी शॉ (79 चेंडूत 47) व यशस्वी जैस्वाल (163 चेंडूत 78) यांनी 87 धावांची सलामी दिल्यानंतरही मुंबईला मध्यप्रदेशविरुद्ध रणजी चषक स्पर्धेतील अंतिम लढतीत पहिल्या दिवसअखेर 5 बाद 248 अशा माफक धावसंख्येवर समाधान मानावे लागले. आपल्या 42 व्या जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी मुंबईला पहिल्या डावात 400 पेक्षा अधिक धावांचा टप्पा सर करण्यासाठी आता सर्फराज खान (नाबाद 40) व शम्स मुलानी (नाबाद 12) यांच्याकडून अपेक्षा असतील.
 
मध्यप्रदेशतर्फे डावखुरा फिरकीपटू कुमार कार्तिकेयने एका एण्डकडून 31 षटके गोलंदाजी करत 91 धावात 1 बळी घेतला. त्या तुलनेत सीमर गौरव यादव (23-5-68-0) बळी घेण्याच्या निकषावर कमनशिबी ठरला. गौरव यादवने मुंबईच्या फलंदाजांवर विशेषतः कर्णधार पृथ्वी शॉवर दडपण राखण्यात कमालीचे यश प्राप्त केले.
संक्षिप्त धावफलक
 
मुंबई पहिला डाव ः 90 षटकात 5 बाद 248 (यशस्वी जैस्वाल 163 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 78, पृथ्वी शॉ 79 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 47, सर्फराज खान 125 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 40, हार्दिक तमोरे 3 चौकारांसह 24, शम्स मुलानी नाबाद 12. अवांतर 3. सारांश जैन 17 षटकात 2-31, अनुभव अगरवाल 19 षटकात 2-56, कुमार कार्तिकेय 31 षटकात 1-91).