बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

रवींद्र जडेजा अब तक 150

भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने वनडे सामन्यात नवा कीर्तिमान करताना 129 व्या सामन्यात बळींचे दीडशतक पूर्ण केले. डाव्या हाताने गोलंदाजी करताना 150 बळी मिळणारा जडेजा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
ईडन गार्डन्सवर झालेल्या इंग्लंडविरूद्ध तिसर्‍या वनडेत जडेजाने हा पराक्रम आपल्या नावे केला. 2009 मध्ये जडेजाने श्रीलंक‍ेविरूद्ध पदार्पण केले होते. रवींद्र जडेजाने वनडे, टेस्ट आणि टी-20 क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करत स्वत:ला सिद्ध केले आहे.
 
गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारात तो अष्टपैलू म्हणून भारतीय संघाचा आधारस्तंभ बनू पाहत आहे.