RCB चा कर्णधार विराट कोहलीने आशा व्यक्त केली की, आयपीएल 2021 मध्ये एक मजबूत बायो बबल असेल
कोविड -19 मुळे इंग्लंड विरुद्ध मँचेस्टर कसोटी सामना पुढे ढकलणे दुर्दैवी असल्याचे सांगत भारतीय कर्णधार विराट कोहलीने आशा व्यक्त केली की या अनिश्चित काळाला सामोरे जाण्यासाठी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा बायो-बबल मजबूत होईल. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय कर्णधाराने काही इतर खेळाडूंसह इंग्लंडविरुद्धची ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळली जाणारी पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिला कारण राष्ट्रीय संघाचे सहकारी फिजिओ योगेश परमार यांना कोविड- 19ची लागण झाली होती.
कोहलीने आरसीबीच्या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मला सांगितले की, 'हे दुर्दैवी आहे की आम्हाला येथे लवकर पोहचावे लागले (कसोटी रद्द झाल्यामुळे दुबईला येण्याच्या संदर्भात), पण कोरोना व्हायरसमुळे गोष्टी खूप अनिश्चित आहेत.' ते म्हणाले, 'अशी परिस्थिती आहे की काहीही होऊ शकते. आशा आहे, आम्ही एक चांगले, मजबूत आणि सुरक्षित वातावरण राखण्यास सक्षम होऊ आणि ते एक अद्भुत आयपीएल असेल.
भारतीय कर्णधार म्हणाला, 'हा एक रोमांचक टप्पा असणार आहे. आमच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि नंतर टी -20 विश्वचषकात भारतीय संघासाठी हे खूप महत्वाचे आहे. कोविड -19 मुळे स्थगित आयपीएलचा दुसरा टप्पा रविवारपासून सुरू होईल तर कोहलीची टीम सोमवारी या टप्प्यातील पहिला सामना खेळेल. या वेळी संघात श्रीलंकेचा लेग स्पिनर वनिंदू हसरंगा आणि सिंगापूरचा फलंदाज टीम डेव्हिडसारखे काही प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. या खेळाडूंच्या आगमनाने कर्णधार आनंदी आहे.