शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (10:44 IST)

मोठी बातमी ! विराट कोहलीने कर्णधार पदावरून राजीनामा दिला,रोहित शर्मा नवा कर्णधार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या कर्णधार पदावरून राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे.येत्या T20 विश्वचषकात नंतर एकदिवसीय आणि T20 संघाचे कर्णधारपद विराट कोहली सोडणार असून रोहित शर्मा त्याजागी कर्णधार पदाची धुरा सांभाळणार.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधारपदी कायम असणार आहे. मात्र एकदिवसीय आणि T20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे. विराट कोहली नंतर रोहित शर्मा कर्णधार पदासाठी योग्य असल्याचे मानले आहे.रोहित शर्माने IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व केले आहे.त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने पाच वेळा IPL जिंकले आहे.
 
मागील दोनवर्षापासून विराट कोहलीच्या कामगिरीत फरक झाल्याचे दिसून येत आहे.येत्या T20 विश्वचषक आणि 2023 चा एकदिवसीय विश्वचषक सामन्यासाठी विराटला आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागणार असून आपली कामगिरी सुधारण्यावर भर द्यावे लागणार.कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय सामन्यात 95 पैकी 65 सामने जिंकले आहे.कसोटी सामन्यात 65 पैकी 38 जिंकले आहे.तर T20 सामन्यात 45 पैकी 29 सामने जिंकले आहे.