संबंधित माहिती
- टीम इंडियासाठी एक वाईट बातमी; सामना जिंकून देणारा हा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडण्याची शक्यता
- बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली, राहुल द्रविडच्या मुलाचा समावेश
- Women's T20 World Cup 2026: महिला भारतीय संघ पाकिस्तानपूर्वी या दोन संघांचा सामना करणार
- सुर्याभाऊची कॅप्टन्सी जाणार
- विराट कोहली एकदिवसीय मालिकेतून बाहेर
ऋतुराज गायकवाडने इतिहास रचला; विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडून जगातील नंबर १ फलंदाज बनण्याचा मान मिळवला
श्रीलंकेत सुरू असलेल्या त्रिकोणीय मालिकेत ऋतुराज गायकवाडने अफगाणिस्तानविरुद्ध ६६ धावांची शानदार खेळी केली. या खेळीसह गायकवाडने विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडला.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या भारत 'अ' संघासोबत श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे तो श्रीलंका 'अ' आणि अफगाणिस्तान 'अ' विरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेत सहभागी होत आहे. या त्रिकोणीय मालिकेत गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याची बॅट आपली कमाल दाखवत आहे. श्रीलंका 'अ' विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर, त्याने अफगाणिस्तान 'अ' विरुद्धही जोरदार फलंदाजी करत ६६ धावा केल्या. या खेळीसह ऋतुराजने भारताचा महान फलंदाज विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडून नवा इतिहास रचला.
अफगाणिस्तान 'अ' संघाविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ऋतुराज गायकवाडने ८० चेंडूंमध्ये तीन चौकारांसह ६६ धावा करत एक शानदार खेळी केली. या खेळीमुळे गायकवाडने एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. लिस्ट 'अ' क्रिकेटमध्ये किमान ५,००० धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे. ऋतुराजने लिस्ट 'अ' क्रिकेटमध्ये ५९.३९ च्या प्रभावी सरासरीने ५,२२७ धावा जमवल्या आहे. या बाबतीत त्याने ५७.९१ च्या सरासरीने १६,४४७ धावा करणाऱ्या विराट कोहलीला मागे टाकले आहे.
Edited By- Dhanashri Naik
