संबंधित माहिती
- आयसीसीने महिला टी-२० विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली
- भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यासाठी आणि महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी मुंबईहून रवाना
- Women’s T20 World Cup 2026 : महिला टी२० विश्वचषक यावर्षी जूनमध्ये होणार; एकूण १२ संघ ट्रॉफीसाठी स्पर्धा करताना दिसतील
- Suzie Bates Retirement: न्यूझीलंडच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडू सुझी बेट्सने निवृत्ती जाहीर केली
- Team India Squad: इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, श्रेयस अय्यर कर्णधार; तिलक वर्मा उपकर्णधारपदी
Women's T20 World Cup 2026: महिला भारतीय संघ पाकिस्तानपूर्वी या दोन संघांचा सामना करणार
आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ हा १२ जून रोजी सुरू होणार आहे. भारतीय संघ १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यापूर्वी, भारतीय संघ दोन संघांविरुद्ध सराव सामने खेळेल.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १४ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यापूर्वी, भारतीय संघ आपली तयारी अधिक मजबूत करण्यासाठी दोन संघांविरुद्ध सराव सामने खेळेल. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठीचे सराव सामने ६ जून रोजी सुरू झाले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी, भारतीय महिला संघ दोन सराव सामने खेळणार आहे. भारतीय संघाचा पहिला सराव सामना वेस्ट इंडिजविरुद्ध असेल आणि दुसऱ्या सराव सामन्यात त्यांचा सामना इंग्लंडशी होईल.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सराव सामना आज, ८ जून (सोमवार) रोजी होणार आहे. हा सामना कार्डिफमधील सोफिया गार्डन्स क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. इंग्लंडविरुद्धचा सराव सामना १० जून (बुधवार) रोजी त्याच मैदानावर होईल. भारताचे दोन्ही सराव सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरु होईल.
महिला T20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्री चरणी, यस्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.
Edited By- Dhanashri Naik