रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (16:58 IST)

भारतीय क्रिकेटपटूंना मिळेल रोबोटिक्सकडून मदत

गुजरातच्या 16 वर्षीय अन्वेषक हर्षवर्धन झालाने शुक्रवारी सांगितले की क्रिकेट खेळाडूंच्या मदतीसाठी असे रोबोट बनविले जाऊ शकतात, जे अंदाज लावू शकतात की चेंडू कोणत्या दिशेने फिरू शकते. 
 
झालाने एक ड्रोन विकसित केला आहे, जे लँडमाइन शोधू शकतो. त्याने सांगितले की ही तकनीक भारतीय क्रिकेटपटूंना वर्ल्ड कपसाठी स्वत:ला उत्तम प्रकारे तयार करण्यास मदत करू शकेल. एयरोबोटिक्स सेवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) झालाने ही माहिती गोवा फेस्ट येथे साझा केली.