शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2024 (09:16 IST)

मुनव्वर फारुकीच्या बॉलवर सचिन ‘आऊट’

sachin tendulkar
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला मैदानावर आऊट करणं तसं कठीणच. पण ही करामत केलीय मुनव्वर फारुकीने. ‘बिग बॉस १७’चे विजेतेपद पटकावल्यानंतर मुनव्वर चांगलाच चर्चेत आहे.
 
आधी स्टँडअप कॉमेडी, वादग्रस्त कमेंट्स यामुळे तो चर्चेत असायचा. मात्र ‘बिग बॉस’मुळे त्याच्या चाहतावर्गात वाढ झालेली दिसत आहे. काल इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा सचिन तेंडुलकरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मैदानात आले होते. सर्वांमध्ये फ्रेंडली सामने खेळले गेले. तेव्हा मुनव्वर फारुकीच्या बॉलवर सचिन तेंडुलकर आऊट झाला. तेव्हा स्टेडियममध्ये माहोल पाहण्यासारखा होता.
 
सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देवच. त्याला काल स्टेडियमवर बॅटिंग करताना पाहून क्रिकेटप्रेमींना खूप आनंद झाला. ३० रन बनवून जेव्हा सचिन आऊट झाला तेव्हा मात्र स्टेडियममध्ये शांतता पसरली. मुनव्वर फारुकीच्या बॉलवर त्याने शॉट मारला. मात्र तो कॅच आऊट झाला. यानंतर सचिनच्या चेह-यावर स्माईल होती. हसत हसतच तो मैदानातून बाहेर गेला. तर इकडे मुनव्वरच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.

Edited By - Ratnadeep Ranshoor