गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

सचिनच्या नावाचा, फोटोचा आणि आवाजाचा गैरवापर, परवानगीशिवाय जाहिरात, गुन्हा दाखल

Sachin Tendulkar lodges a Police complaint at Mumbai Crime Branch
Sachin Tendulkar Fraud दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या परवानगीशिवाय फार्मास्युटिकल उत्पादनांची जाहिरात केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवला आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अज्ञात लोकांनी सचिनचे नाव, फोटो आणि आवाजाचा वापर त्याच्या परवानगीशिवाय जाहिरात करण्यासाठी केला आहे. तेंडुलकरच्या एका सहाय्यकाने गुरुवारी पश्चिम विभागीय सायबर पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
 
तक्रारदाराने सांगितले की, त्याला एका फार्मास्युटिकल कंपनीची ऑनलाइन जाहिरात आली, ज्यात सचिन कंपनीच्या उत्पादन लाइनला मान्यता देत असल्याचा दावा केला होता. त्यांना sachinhealth.in ही वेबसाइट देखील सापडली, ज्याने तेंडुलकरचे छायाचित्र वापरून या उत्पादनांची जाहिरात केली.
 
तक्रारीत म्हटले आहे की सचिनने कंपनीला त्याचे नाव आणि छायाचित्रे वापरण्याची परवानगी दिली नाही आणि त्याची प्रतिमा डागाळत आहे, म्हणून त्याने त्याच्या सहकाऱ्याला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
 
माहिती तंत्रज्ञान कायद्याव्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट) आणि 500 ​​(बदनामी) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे, अधिक तपास सुरू आहे.
 
काय प्रकरण आहे?
5 मे रोजी तक्रारदाराला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एक जाहिरात दाखवण्यात आली, ज्यामध्ये सचिनचा फोटो दिसत होता. या जाहिरातीत सचिन या उत्पादनांना मान्यता देतो, असे म्हटले होते. ही वेबसाइट सचिनच्या नावाचा वापर करून फॅट कमी करणारे स्प्रे विकत होती. उत्पादन खरेदी करणाऱ्या व्यक्तीला सचिनच्या स्वाक्षरीचा टी-शर्टही मिळेल, असा दावाही केला जात होता. मात्र हे वास्तव नाही. या कारणावरून पोलिसात तक्रार करण्यात आली असून आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.