गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

झहीर- सागरिका यांचे शुभमंगल

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खानने गुरुवारी सकाळी नोंदणी पद्धतीने लग्न केले. आता येत्या सोमवारी म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज महाल पॅलेस अॅण्ड टॉवर येथे त्यांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा आणि रिसेप्शन पार पडणार आहे. 
 
सागरिका, क्रिकेटर- अभिनेता अंगद बेदी याची फार जवळची मैत्रिण आहे. अंगदनेच सागरिकाची ओळख झहीरशी करुन दिली होती. दोघांची ओळख दीड वर्षांपूर्वी झाली होती. युवराज-हेजलच्या विवाह सोहळ्यात झहीर आणि सागरिका एकत्र दिसून आले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले होते. मे महिन्यात झहीर- सागरिकाचा साखरपुडा झाला आणि त्यानंतर दोघांनी त्यांचे नाते सर्वांसमोर आणले.