IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामना, संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या
चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित आहेत. भारताने तिन्ही सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे आणि त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत.
दुबईमध्ये सर्व सामने खेळण्याचा फायदा भारताला मिळत असल्याचेही म्हटले जात आहे, परंतु वास्तव असे आहे की भारतीय संघाने सतत कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपांत्य सामना 4 मार्च, मंगळवार रोजी
दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. टॉस त्याच्या अर्धा तास आधी, म्हणजे दुपारी 2:00 वाजता होईल.
दोन्ही संघाचे संभाव्य प्लेइंग-11 पुढीलप्रमाणे आहे...
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.
ऑस्ट्रेलिया: जॅक फ्रेझर मॅकगर्गक, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, अॅडम झांपा, स्पेन्सर जॉन्सन.
Edited By - Priya Dixit