बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 4 जून 2018 (16:15 IST)

सोनू निगमच्या मुलाला‘विराट’कडून खास भेट

निवान क्रिकेटप्रेमी असून बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याचा मुलगा आहे. निवान सध्या खूपच आनंदात आहे. कारण त्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक खास भेटवस्तू दिली आहे. निवान विराट कोहलीचा चाहता आहे. त्याला विराट कोहली मर्यादेपलीकडे आवडतो. याविषयी विराटला कळताच त्याने निवानच्या बॅटवर स्वाक्षरी केली व त्याच्यासोबत एक फोटोही काढला. हा फोटो सोशल मिडियावर सध्या वायरल होत आहे.
 
प्रसिद्ध गायक सोनू निगमचा मुलगा निवान सध्या भारतीय माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या ह्गाताखाली प्रशिक्षण घेत आहे. परंतु विराट कोहलीचे व्यक्तिमत्त्व आणि खेळण्याच्या शैलीचा तो चाहता आहे.