बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 3 जून 2018 (13:43 IST)

चालण्याच्या पद्धतीतून होऊ शकेल व्यक्तीची ओळख

शास्त्रज्ञांनी एक अनोखी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यंत्रणा विकसित केली असून ती लोकांच्या चालण्याच्या पद्धतीआधारे त्यांची ओळख करू शकते. विमानतळांवरील सुरक्षातपासणीवेळी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. हे तंत्रज्ञान सध्याच्या सुरक्षा तपासणी पद्धतींच्या तुलनेच्या जास्त प्रभावी ठरू शकेल, असा दावा केला जात आहे. 
 
हे नवे तंत्रज्ञान थ्रीडी फूट स्टेप (पाऊल) आणि वेळेवर आधारित डाटाच्या विश्लेषणावर काम करते. स्पेनमधील माद्रिद युनिव्हर्सिटी व ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरच्या शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाआधारे शंभर टक्के अचूक पद्धतीने लोकांची ओळख केली. या संपूर्ण प्रणालीत चूक होण्याचे प्रमाण अवघे 0.7 टक्के असते. सुरक्षा तपासणीसाठी सध्या फिंगर प्रिंट, चेहर्‍याचे छायाचित्र, डोळ्यांचे दृष्टिपटलाच्या स्कॅनसारख्या पद्धतींचा सर्वात जास्त वापर केला जातो. या अध्ययनाचे प्रमुख ओमर कोस्टिला यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीचे चालतेवेळी सुमारे 24 वेगवेगळे फॅक्टर व हालचाली होतात. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीची चाल वैशिष्ट्यपूर्ण असते. याचआधारे त्याला सहजपणे इतरांपेक्षा वेगळे केले जाऊ शकते. या हालचालींवर नजर ठेवली तर संबंधित व्यक्तीची ओळख केली जाऊ शकते. हाताचेठसे घेण्याच्या पद्धतीच्या तुलनेत हे तंत्रज्ञान जास्त चांगले परिणाम देते. हे तंत्रज्ञान गजबजलेल्या व गोंगाटाच्या स्थळांवरही पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत जास्त प्रभावीही आहे.