सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 6 मे 2024 (16:25 IST)

T20 World cup: दहशतवाद्यांनी दिली वेस्टइंडीजला हल्ल्याची धमकी

सध्या IPL 2024 स्पर्धा सुरु आहे. त्या नंतर लगेच 1 जून पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये T 20 विश्वचषक स्पर्धा सुरु होणार असून स्पर्धेसाठी अनेक संघानी आपली नावे जाहीर केली आहे. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याची छाया पसरली असून दहशतवाद्यांनी वेस्टइंडीजला या स्पर्धे दरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. क्रिकेट वेस्टइंडीज ने संघाला सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. 

वेस्टइंडीज संघाला ही धमकी उत्तर पाकिस्तान कडून मिळाली आहे. प्रो इस्लामिक स्टेट(IS) ने हे हल्ले करण्याची योजना आखली आहे. आयएस खोरासानच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान शाखेकडून एक व्हिडिओ संदेश जारी करण्यात आला आहे ज्यामध्ये त्याने अनेक देशांमध्ये हल्ले करण्याबद्दल बोलले असून समर्थकांना त्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे. 
 
T20 विश्वचषकाचे सह-यजमान क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्ह्स 
म्हणाले. आम्ही सर्व भागीदारांना आश्वासन देऊ इच्छितो की, टी-20 विश्वचषकात सामील असलेल्या सर्वांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आमच्याकडे सर्वसमावेशक आणि मजबूत सुरक्षा योजना आहे. 

कॅरिबियन मीडियाने त्रिनिदादचे पंतप्रधान कीथ रॉली यांचा हवाला देत म्हटले आहे की, सामना पाहता कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास सुरक्षा यंत्रणा सक्षम आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बार्बाडोसचे क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी आयसीसी टी-20 विश्वचषकादरम्यान हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. रिपोर्टनुसार, प्रो इस्लामिक स्टेटच्या नाशीर पाकिस्तान मीडिया ग्रुपकडून ही धमकी मिळाली आहे. 

विश्वचषक स्पर्धा जून पासून सुरु होणार असून या स्पर्धेचे सामने वेस्टइंडीजच्या अनेक ठिकाणी खेळवले जाणार आहे. बार्बाडोस, गयाना, अँटिग्वा आणि बारबुडा, सेंट व्हिन्सेंट, सेंट लुसिया, ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो या जागतिक स्पर्धेचे सामने आयोजित करणार आहेत.

Edited By- Priya Dixit