सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 5 मे 2024 (16:05 IST)

महिला T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर

Indian womens cricket team
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा बांगलादेशच्या यजमानपदाखाली खेळवली जाणार आहे. यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघ असतील.ही स्पर्धा  अंतिम सामन्यासह एकूण 23 सामने 19 दिवसांत खेळवले जातील. सर्व 10 संघाची विभागणी दोन गटात करण्यात आली आहे. प्रत्येक संघ प्रत्येक गटात 4 -4 सामने खेळतील. प्रत्येक गटात टॉप -2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यांनतर चार संघात प्ले ऑफची लढत लढवतील. 
 
महिला T20 विश्वचषक 2024 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने ढाका आणि सिल्हेत येथे खेळवले जातील. तर उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. 20 ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना खेळवला जाईल.
 
इंडिया च्या गटात ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड, पाकिस्तान आणि क्वालिफायर 1 आहे भारताचा सामना 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार. 
 
T20 विश्वचषक 2024 चे गट-
अ गट: ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, पात्रता १
 
ब गट: दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, क्वालिफायर २
 
T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक
3 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ढाका
3 ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध क्वालिफायर 2, ढाका
4 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर 1, सिलहट
4 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
5 ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
5 ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, ढाका
6 ऑक्टोबर: न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर १, सिल्हेट
6 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, सिल्हेट
7 ऑक्टोबर: वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर २, ढाका
8 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, सिल्हेट
9 ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
9 ऑक्टोबर: भारत विरुद्ध क्वालिफायर १, सिलहट
10 ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर 2, ढाका
11 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
11 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर 1, सिल्हेट
12 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
12 ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ढाका
13 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
13 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिल्हेट
14 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर 2, ढाका 
17 ऑक्टोबर: पहिली उपांत्य फेरी, सिलहट
18 ऑक्टोबर: दुसरी उपांत्य फेरी, ढाका
20 ऑक्टोबर: अंतिम सामना, ढाका
 
Edited By- Priya Dixit