बुधवार, 22 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (15:48 IST)

हार्दिक पंड्या वारंवार जखमी का होतात ?याचे उत्तर पाकिस्तानच्या माजी सलामी वीर ने दिले

The answer to why Hardik Pandya gets injured so often was given by the former Pakistan opener Cricket News In Marathi Webdunia Marathi
क्रिकेटमध्ये, एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याला संघातून वगळण्याची सर्वात कमी शक्यता असते.एकमेव परिस्थिती मध्येच अष्टपैलू खेळाडूला संघात समाविष्ट केले जात नाही जेव्हा तो फलंदाजी आणि चेंडू दोन्हीसह खराब फॉर्ममधून जात असतो.
 
भारताकडे अव्वल अष्टपैलू हार्दिक पंड्या देखील आहे जो टी -20 तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचा अविभाज्य भाग आहे.मात्र, 2018 च्या आशिया कपमध्ये त्यांनी पाठीच्या दुखापती नंतर कमी गोलंदाजी केली आहे. विश्वचषक 2019 नंतर, ते आणखी कमी गोलंदाजी करत होते.मात्र,नुकत्याच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान कर्णधार विराट कोहलीने त्याला गोलंदाजी करायला लावली.
 
हार्दिक पंड्याच्या फिटनेसवर बऱ्याच दिवसांपासून प्रश्नचिन्ह आहे.पाकिस्तानचा माजी सलामीवीर आणि कर्णधार सलमान बटने त्याच्या फिटनेस संदर्भात निवेदन दिले आहे.
 
सलमान बट ने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले आहे की- हार्दिक पंड्याची समस्याअशी आहे की ते खूप सड पातळ आहे.त्यांच्यावर अतिरिक्त भार येताच ते जखमी होतात. त्यांना काही स्नायूंची गरज आहे. जेव्हा ते फलंदाजी करतात तेव्हा ते खूप घातक दिसतात.गोलंदाजी करताना तो कर्णधाराच्या मते आपली षटके काढतो.
 
इमरान आणि कपिल पंड्यापेक्षा अधिक तंदुरुस्त होते
याशिवाय सलमान बटने पंड्याच्या फिटनेसची तुलना कपिल देव आणि इमरान  खान यांच्या फिटनेसशी केली.ते म्हणाले की या दोन माजी दिग्गजांच्या फिटनेसच्या तुलनेत पंड्याची फिटनेस कमी असल्याचे दिसते.
 
सलमान म्हणाले- क्रिकेट खेळताना कपिल आणि इमरान हार्दिकपेक्षा फिट होते.हार्दिकच्या शरीराला पटकन दुखापत का होते याची मला कल्पना नाही.त्याचे फिजिओ आणि ट्रेनर या संदर्भात कार्यरत असतील.
 
विशेष म्हणजे पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर हार्दिक क्वचितच गोलंदाजी करताना दिसले  आहे.अशा परिस्थितीत, टी -20 विश्वचषका दरम्यान,तो अष्टपैलू किंवा फलंदाज म्हणून संघात असेल,हे चित्र स्पष्ट होणं बाकी आहे.
 
हार्दिकची अलीकडची कामगिरी काही विशेष राहिली नाही.फलंदाजीमुळे त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही.पण ते कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतात.
 
27 वर्षीय हार्दिक पंड्या 63 एकदिवसीय आणि 11 कसोटी खेळले आहे. कसोटी सामन्यांमध्ये हार्दिकने 17 बळी घेतले आहेत आणि 532 धावा केल्या आहेत.त्याचबरोबर त्याच्याकडे वनडेमध्ये 1286 धावा आणि 57 विकेट्स आहेत.याशिवाय टी -20 सामन्यांमध्ये त्याने चेंडूने 42 विकेट घेतल्या आणि 484 धावा केल्या.