1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. The challenge for Varun to pass the yo-yo test

यो-यो टेस्ट पास होण्याचे वरूणपुढे आव्हान

challenge
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 12 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार टी-20 मालिकेसाठी निवडलेला फिरकीपटू वरूण चक्रवतीने आतापर्यंत यो-यो टेस्ट पास केलेली नाही. त्यामुळे तो जर फिटनेस टेस्ट उत्तीर्ण होऊ शकला नाही तर त्याला या मालिकेतून बाहेर केले जाऊ शकते. 29 वर्षीय गोलंदाज चक्रवर्ती ऑस्ट्रेलिया दौर्यातसाठीही टी-20 संघात निवडला गेला होता. मात्र, पूर्णपणे तो तंदुरूस्त नसल्याने नंतर त्याच्या जागी टी नटराजनला संघात सामील करावे लागले होते. आता पुन्हा एकदा तो इंग्लंडविरूध्दच्या टी-20 मालिकेसाठी संघात निवडण्यात आला आहे. मात्र त्याने आतापर्यंत यो-यो टेस्ट पास केलेली नाही. याबाबत चक्रवर्तीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मला आतापर्यंत याविषयी कोणतीही माहिती दिली गेली नाही. भारतीय क्रिकेट संघात निवडल्यानंतर प्रथम यो-यो टेस्ट उत्तीर्ण होणे  गरजेचे आहे. या टेस्टमध्ये खेळाडूला 8.5 मिनिटात 2 किलोमीटर धावावे लागते किंवा आपला स्कोर 17.1 असा ठेवावा लागतो. वरूण चक्रवर्ती सध्या मुंबईत आयपीएलचा संघ कोलकाता नाइट राडर्ससोबत सराव करत आहे.
 
वरूणने तामीळनाडूसाठी 1 प्रथमश्रेणी सामना खेळला आहे. मात्र, तो विजय हजारे ट्रॉफीत संघाचा सदस्य नाही. तमिळनाडूच्या सिलेक्टरने वरूणविषयी सांगितले की, आम्ही त्याला टी-20 चा स्पेशालिस्ट खेळाडू मानतो. त्याच्याकडून चार किंवा पाच षटकांपेक्षा जास्त फलंदाजीची अपेक्षा ठेवली गेली नाही पाहिजे. कारण त्याच्या बोटांवर खूप दबाव असतो. 
पुढील लेख
लूट लिया रे... गाडीत पेट्रोल टाकवल्यानंतर अंगावर कपडेही नव्हते