1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 26 डिसेंबर 2021 (14:24 IST)

माजी क्रिकेट पटूच्या आईचे दुःखद निधन, क्रिकेटपटूने ट्विटकरून स्वतः ही माहिती दिली

The former cricketer's mother passed away tragically
पाकिस्तान क्रिकेटसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरच्या आईचे निधन झाले आहे. खुद्द माजी क्रिकेटर शोएब अख्तरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांच्या आईच्या निधनावर क्रीडा जगताशी संबंधित अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. शोएब अख्तरच्या आईचे नाव हमीदा अवान होते. 
शोएबने ट्विट करून माहिती दिली की , शोएब अख्तरने स्वतःच्या आईच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियावर दिली. 
शोएब अख्तरची आई अनेक दिवसांपासून आजारी होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएबच्या आईवर इस्लामाबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.