शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: कोलकाता , शनिवार, 21 डिसेंबर 2019 (16:01 IST)

'हे' महत्त्वाचे खेळाडू राहिले बोलीविना

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत परदेशी खेळाडूंना विशेष पसंती मिळाली. परदेशी खेळाडूंसोबतच या लिलाव प्रक्रियेत अनेक भारतीय खेळाडूंवरही बोली लागली. पण काही खेळाडू मात्र अनपेक्षितपणे बोलीविना राहिले. त्यांना कोणीही वाली मिळाला नाही.
 
यांच्यावर नाही लागली बोली
कॉलिन डी ग्रँडहोम, टीम साऊदी, मार्टिन गुप्टिल, कॉलिन मुनरो (न्यूझीलंड), मार्क वूड (इंग्लंड), केजरिक विलियम्स, शाय होप, जेसन रॉय (वेस्टइंडीज), मुस्तफिजूर रहमान, मश्फिकूर रहीम (बांगलादेश).
 
लिलाव संपूनही संघांकडे कोट्यवधी रुपये शिल्लक 
आयपीएलच्या लिलावाच्या प्रक्रियेनंतरदेखील काही संघांकडे रक्कम शिल्लक राहिली तर काही संघातील खेळाडूंचे स्लॉटही रिक्त राहिले.
 
संघाची शिल्लक रक्कम आणि खेळाडूंसाठी रिक्त स्लॉटस्‌ (जागा) :
चेन्नई सुपर किंग्ज- शिल्लक रक्कम - 15 लाख खेळाडूंसाठी रिक्त जागा- 3 (2 भारतीय, 1 परदेशी)
 
मुंबई इंडियन्स- शिल्लक रक्कम - 1 कोटी 95 लाख, खेळाडूंसाठी रिक्त जागा - 1 (1 भारतीय)
 
दिल्ली कॅपिटल्स- शिल्लक रक्कम - 9 कोटी खेळाडूंसाठी रिक्त जागा- 3 (3 भारतीय)
 
कोलकाता नाइट राडर्स- शिल्लक रक्कम - 8 कोटी 50 लाख खेळाडूंसाठी रिक्त जागा- 2 (2 भारतीय)
 
किंग्ज इलेव्हन पंजाब- शिल्लक रक्कम - 16 कोटी 50 लाख, खेळाडूंसाठी रिक्त जागा-0 
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- शिल्लक रक्कम - 6 कोटी 40 लाख, खेळाडूंसाठी रिक्त जागा- 4 (4 भारतीय)
 
राजस्थान रॉल्स- शिल्लक रक्कम- 14 कोटी 75 लाख खेळाडूंसाठी रिक्त जागा- 0 
 
सनराझर्स हैदराबाद- शिल्लक रक्कम- 10 कोटी 10 लाख खेळाडूंसाठी रिक्त जागा- 0