...हे तर दर्जेदार क्रिकेटपटूंचीफौज तयार करण्याचे पाऊल

जोहान्सबर्ग| Last Updated: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (14:27 IST)

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने इंग्लंडच्या बहुचर्चित रोटेशन पॉलिसीचे समर्थन केले आहे. याबाबत तो म्हणाला की, हे हुशारीने उचललेले पाऊल दर्जेदार क्रिकेटपटूंची फौज तयार करत आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (इसीबी) रोटेशन पॉलिसीवीर क्रिकेट जगतात कठोर टीका होत आहे. इसीबीने खेळाडूंवरचा अधिक भार कमी करण्यासाठी व त्यांना जैव सुरक्षित वातावरणात राहताना मानसिक थकवपासून वाचविण्यासाठी ही पॉलिसी सुरू केली आहे. इंग्लंडने हे आगळे-वेगळे पाऊल उचलल्यामुळे अनेक मोठ्या सामन्यांमध्ये व मालिकांमध्ये त्यांचे प्रमुख खेळाडू खेळू शकत नाहीत. मात्र स्टेनला वाटते की, यामुळे इंग्लंडची बाकड्यावरील फळी मजबूत होत आहे. ज्यामुळे आयसीसीच्या भविष्यातील स्पर्धांसाठी संघांची निवड करताना त्यांना त्याची मोलाची मदत होणार आहे. स्टेनने टि्वट केले की, इंग्लंडची रोटेशन पॉलिसी हळुहळू दर्जेदार क्रिकेटपटूंची फौज तयार करत आहे. आपण भलेही त्यावर टीका करत असू, मात्र आगामी आठ वर्षांमध्ये आयसीसीच्या आठ मोठ्या स्पर्धा होणार आहेत. त्यावेळी त्यांना संघांची निवड करताना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा अनुभव असलेल्या क्रिकेटपटूंना शोधण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही.
आयसीसीचच्या स्पर्धांबाबत कदाचित मी चुकीचा असेन, मात्र मला हेच सांगण्यात आले आहे. तरीही काहीही असले तरी इंग्लंडने हे खूपच बुध्दिमत्तेने टाकलेले पाऊल आहे.
या रोटेशन पॉलिसीमुळे इंग्लंडचा यष्टिरक्षक जोस बटलर भारताविरूध्दच्या पहिल्या दोन कसोटीनंतर व अष्टपैलू मोईन अली दुसर्या
कसोटीनंतर स्वदेशी परतले आहेत. तर फलंदाज जॉनी बेरस्टो आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड पहिल्या दोन सामन्यांमध्ये बाहेर राहिल्यानंतर मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी संघाशी जोडले गेले आहेत. इतकेच नाही तर संघ व्यवस्थापन अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अॅमण्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनाही मधल्या काळात विश्राम देत आला आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

भडकलेल्या आफ्रिदीने आयसीसीला विचारले प्रश्न

भडकलेल्या आफ्रिदीने आयसीसीला विचारले प्रश्न
पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी आयसीसीच्या त्या नियमामुळे नाखूश झाला आहे, जो ...

अनुष्का आणि विराटच्या घरी नाही एकही नोकर

अनुष्का आणि विराटच्या घरी नाही एकही नोकर
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे एक स्टार कपल. हे कपल अगदी डाऊन टू अर्थ आहे. हो, नाव, ...

...हे तर दर्जेदार क्रिकेटपटूंचीफौज तयार करण्याचे पाऊल

...हे तर दर्जेदार क्रिकेटपटूंचीफौज तयार करण्याचे पाऊल
छत्रपती महाराणी ताराबाई भोसले या रणरागिणीची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ...

वसीम जाफर यांनी मंगळवारचे फोटो अनोख्या पद्धतीने शेअर करून ...

वसीम जाफर यांनी मंगळवारचे फोटो अनोख्या पद्धतीने शेअर करून भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले
भारताचे माजी क्रिकेट कोच वसीम जाफर काही काळ आपल्या सोशल मीडिया पोस्टामुळे चर्चेत आले ...

IPL Auction 2021: जूही चावलाने आर्यन आणि जान्हवीचा फोटो ...

IPL Auction 2021: जूही चावलाने आर्यन आणि जान्हवीचा फोटो शेअर केला, खास संदेश लिहिला
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 व्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी ...