गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 11 फेब्रुवारी 2024 (15:25 IST)

अंडर-19 वर्ल्डकप LIVE : ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी, पहिल्या ओव्हरपासून चुरशीची लढत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (11 फेब्रुवारी) अंडर-19 वर्ल्डकपची फायनल मॅच खेळली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथील विलोमूर पार्क स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
ऑस्ट्रेलियाने 5 ओव्हरनंतर एक विकेट गमावून 33 धावा केल्या आहेत. राज लिंबानीने ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट टीपली.
 
राजने तिसऱ्या ओव्हरमध्ये भारताला पहिले यश मिळवून दिलं. त्याने सॅम कॉन्स्टासला बोल्ड आऊट केले.
 
8 चेंडू खेळूनही कॉन्स्टासला खाते उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाने 16 धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट गमावली.
 
त्यानंतर नमन तिवारीने दुसरी आणि तिसरी विकेट घेतली. हॅरी डिक्सन 56 चेंडूत 42 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
 
त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. नमनच्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर डिक्सनने शॉट खेळला. पण बॉल थेट मुरुगनकडे गेला. त्याने कोणतीही चूक न करता झेल घेतला.
ऑस्ट्रेलियाने 24 ओव्हरमध्ये 2 बाद 106 धावा केल्या. हरजस सिंग 2 धावा करून खेळत आहे. रायन हिक्स 6 धावा करून खेळत आहे.
 
हॅरी डिक्सन आणि सॅम कॉन्स्टस संघाची सलामी देण्यासाठी आले होते. भारताकडून पहिली ओव्हर राज लिंबानीने टाकली, त्याने या ओव्हरमध्ये फक्त एक धाव दिली. पण भारतासाठी फायनलमध्ये धोकादायक ठरू शकतो तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार हग बेवगेन आणि वेगवान गोलंदाज टॉम स्ट्रेकर.
 
कर्णधारानं फलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तर स्ट्रेकरनं पाकिस्तानच्या विरोधाक सेमिफायनल सामन्यात 24 धावांवर 6 बळी घेत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
 
पण, ऑस्ट्रेलियाच्या विरोधात होणाऱ्या फायनलमध्ये विजय मिळवण्यात तरुण भारतीय संघ काहीही कसर ठेवणार नाही.
 
उदय प्रताप सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघानं आतापर्यंत ज्या प्रकारचा दबदबा संपूर्ण स्पर्धेत दाखवला आहे, त्यामुळं संघ विजयी बनूनच परत येणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
भारतानं ऑस्ट्रेलियाला 2012 आणि 2018 च्या फायनलमध्ये हरवलं होतं. त्याचा फायदा भारताला होऊ शकतो.
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी सेमीफायनल सामने अत्यंत रोमांचकपणे पद्धतीनं जिंकून फायनल खेळण्यासाठीचे खरे दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे.
याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी अत्यंत तणावाच्या स्थितीतील सामने एक-एक गडी राखून जिंकले.
 
त्यावरून हे स्पष्ट होतं की, रविवारी होणाऱ्या फायनलमध्येही दोन्ही संघांमध्ये चांगली लढाई पाहायला मिळू शकते.
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ :
भारत: उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी आणि सौम्या पांडे.
 
ऑस्ट्रेलिया: ह्यू वायबझेन (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, हॅरी डिक्सन, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ्ट मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन, कॅलम विडलर.
 
Published By- Priya Dixit