बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2017 (15:16 IST)

विराट विक्रम : कमी डावात १६ हजार धावा पूर्ण

भारतीय फलंदाज विराट ने मोठी कामगिरी केली आहे. यामध्ये आज  श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तिस-या कसोटीत विराटने शनिवारी 5 हजार धावां पूर्ण केल्या. सोबतच त्याने  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 16 हजार धावा पूर्ण केल्या असून  तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे. त्यामुळे दोन विक्रम त्याच्या नावावर दोन विक्रम नोंदवले गेले आहे. 

विराटने 350 डावात 54.27च्या सरासरीने 16012 धावा पूर्ण केल्या. विक्रम या पूर्वी  आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर होता. अमलाने 363 डावात ही कामगिरी केली होती.तर विरत हा  कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने 5 हजार धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय फलंदाज आहे. 

 सुनिल गावसकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये वेगाने 5 हजार धावा पूर्ण केल्या.  त्यांनी 95 डावांमध्ये हा टप्पा गाठला. विरेंद्र सेहवाग (98डाव), सचिन तेंडुलकर (103 डाव) आणि विराट कोहली (105 डाव) चौथ्या स्थानी आहे.  अशी कामगिरी करणारा विराट 11 वा भारतीय फलंदाज आहे.