बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जुलै 2018 (08:55 IST)

विराटचे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम

भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली. या यादीत विराट ९११ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. विराटने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत अनुक्रमे ७५, ४५ आणि ७१ धावा केल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्याला संघाला मालिका विजय मिळवून देता आला नाही. परंतु, त्याला या मालिकेअंती क्रमवारीत २ गुण मिळाले. या दोन गुणांमुळे तो ९११ गुणांवर पोहोचला. विराटची ही एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोकृष्ट कामगिरी आहे.
 
याशिवाय, चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याचीही क्रमवारीत बढती झाली आहे. तो क्रमवारीत सहाव्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे.