मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मे 2018 (09:09 IST)

विराट 'या' ऐतिहासिक सामन्याला मुकणार

virat kohali

टीम इंडिया आणि अफगानिस्तानमध्ये ही टेस्ट मॅच 14 जूनपासून बंगळुरुमध्ये खेळली जाणार आहे. या ऐतिहासिक सामन्याला विराट कोहली मुकणार आहे. अफगानिस्तानविरुद्ध ही टेस्ट मॅच टीम इंडियासाठी आगामी इंग्लंड आणि आयरलँडच्या दौऱ्याआधी वॉर्म अप सारखी आहे. विराट ऐवजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जूनमध्ये इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार आहे. यामुळे तो या मॅचला मुकणार आहे.

भारतीय टीमचा टेस्ट स्पेशलिस्ट खेळाडू चेतेश्वर पुजारा सध्या यार्कशायरकडून काउंटी क्रिकेट खेळतो आहे. बंगलूरुमध्ये अफगानिस्तानच्या विरुद्ध होणाऱ्या या मॅचसाठी तो भारतात येणार आहे. अफगानिस्तान विरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्मा, शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांना देखील संधी मिळू शकते. 8 मेला टीमची घोषणा होणार आहे. यासाठी भारत ए टीमची घोषणा देखील होणार आहे. जी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर खेळणार आहे.