शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (10:11 IST)

आरसीबीची जर्सी नंबर 12 फॅन्सला समर्पित

आयपीएलमधील इतर टीमच्या तुलनेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाचे फॅन फॉलोविंग अधिक आहे. दरवर्षी आरसीबी चाह्त्यांसाठी एक सरप्राईज घेऊन येते. यंदा आरसीबीने जर्सी नंबर 12 रिटायर केली आहे. आणि ती जर्सी आरसीबीच्या फॅन्सला समर्पित केली आहे. आरसीबीद्वारा शेअर करण्यात आलेल्या फेजबूक पेजवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. विराट कोहलीने फॅन्सला धन्यवाद म्हटले आहे. 'आज टीमबाबत बोलण्यासाठी नव्हे तर टीमच्या मागील टीमसाठी मी आलो आहे. ती टीम म्हणजे 'फॅन्स' आहे. इतकी वर्ष आम्हांला पाठिंबा देणार्‍या फॅन्सला खास ट्रीब्युट आहे.' 
 
'12 नंबर लिहलेली जर्सी ही केवळ चाहत्यांसाठी असेल. आमचे सारेच फॅन्स आपल्या टीमचे 12 वे सदस्य आहेत. 'अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आरसीबीचा पहिला सामना 8 एप्रिलला कोलकत्त्यातील ईडन गार्डनमध्ये खेळला जाईल. कोलकत्ता नाईड रायडर्स विरूद्ध हा सामना खेळला जाईल.