1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Virat Kohli, Anil Kumble, BCCI

विराट, कुंबळेला हवी पगार वाढ

नवी दिल्ली- बीसीसीआयच्या वार्षिक करारतील अ श्रेणीतील क्रिकेटपटूंच्या पगारात 150 टक्क्यांनी वाढ करावी, अशी मागणी आहे ती भारताचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे व कर्णधार विराट कोहली यांनी. यासह संघाच्या सपोर्ट स्टाफच्या पगारातही वाढ व्हावी, असेही या मागणीत नमूद करण्यात आले आहे.
 
कुंबळेने हैदराबादमध्ये प्रशासकीय समितीपुढे याबाबत सादरीकरण केले आहे. यावेळी बीसीसीआय अधिकार्‍यांपैकी सीईओ राहुल जोहरी, सहचिटणीस अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरूद्ध चौधरी ही मंडळीही उपस्थित होती. कोहली यावेळी उपस्थित नव्हता पण त्याने स्काईपहून संवाध साधला.
पुढील लेख
परेश रावल यांच्या ट्विटवरून वाद