मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

14 एप्रिलला मैदानात दिसू शकतो कोहली

भारतीय कर्णधार विराट कोहलीचे फिट होण्याचे लक्षण दिसत असून इंडियन प्रीमिअर लीगच्या 10 व्या संस्करणात 14 एप्रिलला आपल्या टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या पुढल्या सामन्यात वापसी करू शकतो.
विराटला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामान्यात खांद्याला दुखापत झाली होती ज्यामुळे त्याला आयपीएल 10च्या आधीच्या सामन्यातून बाहेर राहवे लागले होते. बंगुळूरूचे कर्णधार कोहलीच्या अनुपस्थितीत सध्या टीमची कमान शेन वॉटसनने सांभाळली आहे. परंतू टीम आपल्या तीन सामन्यांतून फक्त एक सामना जिंकू शकली.
 
विराटने सोशल साईट इंस्टाग्रामवर वजन उचलताना एक व्हिडिओ पोस्ट करत संकेत दिले की त्यांचा खांदा आता पूर्णपणे बरा आहे. विराटने लिहिले की मैदानात वापसीसाठी आता अजून वाट बघणे शक्य नाही. मी पोहचत आहे.
 
विराटने आपल्या संदेशमध्ये 14 एप्रिलला वापसी करण्याचे संकेत दिले आहे. हा सामना बंगळूरूला आपल्या मैदानावर खेळायचा आहे.
 
मी 120 टक्के फिट झाल्यावरच वापसी करेन असे विराटने आधीही सांगितले होते. आता एम चिन्नास्वामी स्टेडियमवर विराटचे चाहते त्यांना खेळताना बघू शकतील अशी उमेद केली जात आहे.