रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (14:53 IST)

विराट कोहलीने मुंबईत सुरू केले नवे रेस्टॉरंट; तेही या दिग्गज व्यक्तीच्या बंगल्यात

virat cricket restaurant
बॉलिवूडचे दिग्गज गायक किशोर कुमार यांनी अनेक श्रवणीय सदाबहार गाणी रसिकांना दिली. त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे. गाण्यांमुळे, मधुर आवाजामुळे आजही त्यांचे नाव अनेकांच्या ओठावर असते. पण आता मात्र किशोर कुमार यांचे नाव विराट कोहलीमुळे चर्चेत आले आहे. कारण विराट आता किशोर कुमार यांच्या घरात नवीन रेस्टॉरंट सुरु केले आहे.
 
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा किशोर कुमारांचा मोठा फॅन आहे. यामुळेच आता त्याने किशोर कुमार यांचा मुंबईच्या जुहू येथील बंगला भाड्याने घेतला आहे. विराटने पाच वर्षांसाठी हा बंगला भाड्याने घेतला असून, यात त्याने एक हाय ग्रेड रेस्टॉरंट सुरू केले आहे. विराटने त्याच्या रेस्टॉरंटचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
 
विराट कोहली हा फिटनेस फ्रीक आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्याला क्रिकेटइतकीच वेगवेगळे पदार्थ खाण्याचीही खूप आवड आहे. मूळ दिल्लीचा असलेल्या विराटला छोले भटुरे खूप आवडतात. यामुळेच त्याने क्रिकेटसोबतच त्याची रेस्टॉरंटची चेन सुरू केली आहे. त्याने यापूर्वी दिल्लीत दोन रेस्टॉरंट खरेदी केले आहेत. तसेच काही प्रमुख शहरांमध्येही तो त्याच्या हॉटेल्सची चेन वाढवणार आहे.
 
विराटने त्याच्या ‘वन८ कम्युन’ या नवीन रेस्टॉरंटची झलक दाखवली. विराटने किशोर कुमार यांच्या ‘गौरी कुंज’ या बंगल्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले आहे. व्हीडिओमध्ये विराट कोहलीसोबत प्रसिद्ध होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलही दिसत आहे. दोघेही या नवीन रेस्टॉरंटला भेट देताना दिसत आहेत. यादरम्यान विराट मनीषला रेस्टॉरंटबाबत माहितीही देत आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor