गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (12:19 IST)

Virat Kohli : चेहऱ्याला लागला चेंडू, थोडक्यात बचावला विराट

virat kohli
Virat Kohli : भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेत विजयाने सुरुवात केली, रोहितच्या संघाने केपटाऊन मध्ये ऐतिहासिक विजय नोंदवला आणि मालिका ड्रॉ करून 1- 1 च्या बरोबरीत आणली. या सामन्यात बुमराहचा चेंडू विराटच्या चेहऱ्यावर लागला आणि तो थोडक्यात बचावला. 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सदर घटना घडली असून या मध्ये भारतीय गोलंदाजाने यजमान संघाचे फलंदाजाना अवघ्या 55 धावांत गारद केले. या सामन्यात विराट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना बुमराहच्या हातात चेंडू होता. तर डेव्हिड बेंडिंग हॅम च्या बॅट ने चेंडू लागून वेगाने विराटच्या दिशेने गेला विराटने हाताने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला चेंडू हाताला लागून त्याच्या चेहऱ्याला लागला. विराट थोडक्यात बचावला. हे पाहून चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला. मालिका ड्रॉ झाली या सामन्यात विराटाचे मोठे योगदान होते.त्याने पहिल्या डावांत 38 तर दुसऱ्या धावांत 76 धावांची खेळी खेळली. 

केपटाऊनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे.दोन्ही संघाचे एकूण 6 सामने झाले असून 4 सामन्यांत भारताचा पराभव झाला तर भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव  केला. 
 
 Edited by - Priya Dixit