गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (11:54 IST)

विराट कोहली जखमी अवस्थेत दिसले

virat kohli
विराटचा जखमी अवस्थेतील फोटो सध्या व्हायरल झाला असून त्यात त्याच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आहे. हे पाहून चाहते काळजीत आले आहे.  भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा ताजा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे चाहते खूप चिंतेत असून कोहलीची प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

विराट कोहलीने सोमवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर केली. या फोटोमध्ये कोहलीने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर काही जखमांच्या खुणा आहेत. त्याच्या नाकावर बँड-एड पण होती, पण चेहऱ्यावर हसू होतं. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करताना कोहलीने लिहिले की, "तुम्ही दुसरा माणूस पाहावा."
 
कोहलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांनी अनेक अंदाज लावले. मात्र हा फोटो कधी काढण्यात आला हे विराटने स्पष्ट केलेले नाही. त्याने ते का शेअर केले? हा फोटो एखाद्या जाहिरातीच्या शूटिंगमधील असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. कोहलीला कोणतीही दुखापत नाही. मेकअपच्या माध्यमातून त्याच्या चेहऱ्यावर जखमा निर्माण झाल्या आहेत.हा फोटो पाहून चाहते प्रतिक्रिया देत आहे. 
एका चाहत्याने विचारले विराटला काय झाले?आरसीबीने विराट कोहलीला पुन्हा एकदा कायम ठेवले आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून तो या संघाकडून खेळत आहे. 

Edited by - Priya Dixit