गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जून 2021 (20:06 IST)

WTC फाइनल 2021:टीम इंडिया ने जाहीर केले खेळाडूंचे नाव

WTC Final 2021: Team India announces names of players marathi news
न्यूझीलंडनंतर भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठीही आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. 18 जून रोजी भारतीय आणि किवी संघ साऊथॅम्प्टनच्या एजेस बाऊल मैदानावर दोन दोन हात करताना दिसणार.
 
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी कसोटीच्या विश्वचषक फायनलच्या समांतर सामन्यात होईल. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दोन कसोटी सामने जिंकणारा भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे याला उपकर्णधार म्हणून स्थान देण्यात आले आहे.
 
तसेच या संघात विकेटकिपर म्हणून ऋषभ पंत याचा समावेश करण्यात आला आहे.तर बॅकअप किपर म्हणून ऋध्दिमान साहा ला ठेवण्यात आले आहे.रोहित शर्मा आणि शभुमन गिल हे  खेळाची सुरुवात करतील.आणि संघात दोन फिरकी पटू म्हणून अश्विन आणि जडेजा दिसणार आहे.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारताच्या विजयातील नायक शार्दुल ठाकूरच्या जागी न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अनुभवी उमेश यादवला 15 जणांच्या भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
 
ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान उमेश, मोहम्मद शमी आणि हनुमा विहारी जखमी झाले. आयसीसीच्या टीम प्रोटोकॉलनुसार विराट कोहलीच्या नेतृत्वात घोषित झालेल्या संघात तिघांनी पुनरागमन केले आहे.
 
शार्दुल व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर शेवटच्या 11 मध्ये असलेले मयांक अगरवाल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही 15 सदस्यीय संघातून वगळण्यात आले आहे. होम सीरिजचा नायक अक्षर पटेलने ही इंग्लंडविरुद्धच्या या घरच्या मालिकेतुन  स्थान गमावला आहे.
 
संपूर्ण टीम -विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेट कीपर ),ऋद्धीमान  साहा (विकेट कीपर),रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
 
--