सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 12 जून 2021 (19:46 IST)

India tour of sri lanka :भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज

येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा करण्यात आली आहे .परंतु भारताचा मुख्य संघ त्याच वेळी इंग्लंड दौऱ्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साठी दाखल होणार असल्याने विराट कोहली,रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या खेळाडूंची अनुपस्थिती असणार आणि भारताच्या दुसऱ्या संघाला श्रीलंकेच्या दौऱ्यावर पाठवणार.असे सूचक वक्तव्य BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले.
 
एकूण 20 खेळाडूंची निवड या संघात करण्यात आली आहे. या संघाची संपूर्ण जबाबदारी प्रथमच सलामीवीर शिखर धवन वर देण्यात आल्याचे संकेत दिले जात आहे.या दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून पारस म्हांबरे हे देखील  जाण्याची शक्यता आहे.कारण भारताचे मुख्य प्रशिक्षक रविशास्त्री हे इंग्लड दौऱ्यावर असणार.माजी कसोटीपटू राहुल द्रविड हे देखील भारतीय संघासह जाऊ शकतात. अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही.
 
या दौऱ्याची सुरुवात वनडे मालिके होणार असून 13,16 आणि 19 जुलै वन डे तर 22 ,24 आणि 27 जुलै रोजी T 20 मालिका खेळल्या जाणार.  
भारतीय संघा समोर सूर्यकुमार यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, संजू सॅमसन असे पर्याय आहेत. या पैकी 11 मध्ये कोणाची निवड होणार हे महत्त्वाचे आहे.
 
भारतीय संघाजवळ युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चाहर, क्रुणाल पंड्या, वरुण चक्रवर्ती, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल रवि बिश्नोई,असे एका पेक्षा एक सरस स्पिनर्स पर्याय म्हणून आहेत
वेगवान गोलंदाज भुवनेश कुमार याला उपकर्णधारची जबाबदारी दिली जाऊ शकते.दीपक चाहर, नवदीप सैनी, युवा गोलंदाज कार्तिक त्यागी, टी नटराजन हे भुवीच्या साथीला असतील. तसेच कमलेश नागरकोटी, ईशान पोरेल आणि शिवम मावी हे पर्याय म्हणून आहेत.