गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 9 जून 2021 (15:24 IST)

चेतेश्वर पुजाराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल : पार्थिव पटेल

Cheteshwar Pujara
न्यूझीलंडविरुध्दच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात चेतेश्वर पुजारा हा भारताचा हुकमी एक्का आहे. या सामन्यात तो भारताकडून सर्वाधिक धावा काढण्यात यशस्वी ठरणार असल्याने त्याची भूमिका महत्त्वपूर्ण असेल असे मत भारताचा माजी यष्टिरक्षक पार्थिव पटेल याने मांडले. यावेळी त्याने गोलंदाजीत मोहम्मद शमीही मोलाचा सिध्द होईल, असेही सांगितले.