शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 एप्रिल 2021 (15:30 IST)

जगाल तर जेवाल’; लाॅकडाऊन वाढवण्याबाबत जितेंद्र आव्हाडांची रोखठोक भूमिका

लवकरच राज्यातील या निर्बंधांची मुदत संपणार आहे. यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी “ जगाल तर जेवाल”, असं म्हणतं थेट निर्बंध वाढवण्याची भूमिका घेतली आहे.
 
राज्यात लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. महाराष्ट्र आणि मुंबईची काही दिवसांपूर्वीची रुग्ण संख्या पाहा आणि आताची पहा ती नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय. पहिला विषाणू हा आताच्या विषाणूपेक्षा वेगळा आहे. माणसाच्या शरीरातला खूप ऑक्सिजन तो खात आहे. त्यामुळे आपल्याला खूप ऑक्सिजनची गरज भासणार आहे. यावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागात आता प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे असाच कोरोना वाढला तर तिथल्या यंत्रणेवर ताण पडून ती कोलमडू शकते. प्रत्येक कुटुंबातील किंवा ओळखीतल एक जण तरी गेलं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
 
यावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागात आता प्रादुर्भाव वाढतोय. तिथल्या यंत्रणेवर ताण पडून ती कोलमडू शकते. प्रत्येक कुटुंबातील किंवा ओळखीतलं एक जण तरी गेलं आहे. माझे एका शब्दात उत्तर आहे, जगाल तर जेवाल. जगला नाहीत तर जेवणार कुठून? सर सलामत तो पगडी पचास, असं देखील आव्हाड म्हणाले आहेत.