बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 7 डिसेंबर 2016 (10:50 IST)

माझ्यावर चित्रपट आला तर अक्षयने माझी भूमिका करावी - युवराज

युवराज सिंगचे आयुष्य एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटापेक्षा नक्कीच कमी नाही. स्टुअर्ट ब्रॉडला सहा षटकार खेचणे असो, विश्वचषक स्पर्धेचा मालिकावीर बनणे असो, प्रसिद्ध बॉलिवूड नायिकेसोबत रोमान्स करणे असो वा कॅन्सरला मात करणे असो त्याचे पूर्ण आयुष्य रोमांचाने भरलेले आहे. त्यामुळे युवराज सिंगच्या आयुष्यावर चित्रपट यावा अशी अपेक्षा जर निर्माते आणि चाहते करीत असतील तर त्याच काहीच गैर नाही. 
 
जर तुम्ही युवराजला विचारल की तुला या भूमिकेसाठी कोणता अभिनेता योग्य वाटतो तर रिअल लाइफ खिलाडीची पहिली पसंती बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी अक्षय कुमार ही आहे. युवराज सिंगने या प्रश्नांची उकल केली आपली दीर्घकालीन मैत्रिण नेहा धुपियासोबत.