मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले पूर्ण

football team
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये आपल्या डोळ्यावर एका विशेष स्टाइलने हात ठेवत फोटो शेअर करायचे आहे. 
 
भारतीय क्रिकेटर केएल राहुल मॅच दरम्यान या चॅलेंजमुळे चर्चेत आले होते. आता ‘डेले अली चॅलेंज’ चा क्रेझ बॉलीवुडपर्यंत पोहचला आहे. अलीकडे बॉलीवुड स्टार्सदेखील ‘डेले अली चॅलेंज’ पूर्ण करुन आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे.
 
इंग्लंडचे फुटबॉलर डेले अली यांच्या नावावर असलेल्या या चॅलेंजला आपल्या हाताच्या बोटं मोडत डोळ्यावर ठेवायचे आहे. हे हॅड-ट्रिक दिसायला सोपं असलं तरी करायला जरा कठिण आहे.
 
अलीकडेच शाहिद कपूरने ‘डेले अली चॅलेंज’ स्वीकार करत आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता नंतर त्याने म्हटले की हे करणे सोपे आहे. नंतर शाहिदने कबूल केले की ही ट्रिक करायला वेळ लागला.

आता रणबीर कपूरने देखील  मॅनचेस्टर सिटी फुटबॉल क्लबच्या एका इवेंटमध्ये हे चॅलेंज सोपेरीत्या पूर्ण केले.