शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

काय आहे ग्रीन क्रॅकर्स? सर्वोच्च न्यायालयाने ज्यांना इको-फ्रेंडली म्हटले !

दिवाळीला फटाके विक्रीबद्दल सर्वोच्च न्यायालयाद्वारे दिलेल्या निर्देशानुसार फटाके जाळण्यासाठी रात्री 8 ते 10 ची वेळ निर्धारित केली गेली आहे. या वेळेत फटाके केवळ 2 तास जळाता येतील. याव्यतिरिक्त, दिवाळी किंवा लग्न प्रत्येक सणात, केवळ ग्रीन क्रॅकर्स, जे कमी प्रदूषक असतात, तेच वापरु शकतात.
 
फायरकेकर्समुळे इतर प्रदूषणांपेक्षा हजारपट अधिक प्रदूषण होतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते काही क्रॅकर्स आहेत जे कमी प्रदूषण करतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 25 मायक्रोग्रॅम क्यूबिक मीटरची मर्यादा निश्चित केली आहे परंतु भारतात मर्यादा 60 मायक्रोग्रॅम क्यूबिक मीटरची आहे. परंतु दरवर्षी दिवाळीच्या फटाकेमुळे झालेल्या प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही कठोर कारवाई केली आहे. चला ज़ाणू या काय असतात ग्रीन क्रॅकर्स. 
 
* काय आहे ग्रीन क्रॅकर्स?
 
ग्रीन क्रॅकर्स स्वरूप, बर्न आणि ध्वनीने सामान्य फटाक्यांसारखे असतात परंतू प्रदूषण कमी करतात. सामान्य फायरक्रॅकर्सच्या तुलनेत यांना जाळल्याने 40 ते 50 टक्के कमी प्रमाणात हानिकारक वायू निर्माण होते. सामान्य फायरक्रॅकर्स जाळल्याने नायट्रोजन कार्बन मोनोऑक्साइड आणि सल्फर गॅस मोठ्या प्रमाणावर वातावरणात घुळते. हे फटाके पूर्णपणे प्रदूषण मुक्त असतात असे म्हणता येणार नाही. तसेच या क्रॅकर्समध्ये आवाज देखील खूप कमी होतो.
 
* प्रकाशासह दिवाळी साजरा करा.
आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की फुलझडी अत्यंत कमी प्रदूषण करते. फुलझडी नाग गोळ्यांहूनदेखील कमी धोकादायक आहे. याव्यतिरिक्त, 2 मिनिट जळून प्रकाश पसरवणारी फुलझडी 6 मिनिट तडतडणार्‍या लडी पेक्षा अधिक सुरक्षित आहे.
 
* विस्फोटच्या हिशोबाने सुद्धा कमी.
खरं तर सामान्य माणसाचे कान 60 डेसिबलपेक्षा जास्त ध्वनी सहन करू शकत नाही. 60 पेक्षा जास्त डेसिबल असलेले फटाके या दिवाळी आपण सोडू शकणार नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल आतापर्यंत दिवाळीत सोडण्यात येणारे फटाके 80 हून अधिक डेसिबलची ध्वनी निर्माण करत होते.