गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

या गावात सगळ्यांचाच जन्म 1 जानेवारीला

डेहराडून- आजी- आजोबा, आई- वडील, भाऊ- बहिण, काका-काकी इतकेच काय तर शेजारी- पाजारी, गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचा जन्म एकाच दिवशी झाला आहे, असे कुणी सांगितले तर?..तुम्ही म्हणाल काहीतरीच काय? पण असे झाले.
 
हरिद्वारपासून 20 किमीवरील खाटा गावात हा अजब आणि तितकाच गजब वाटणारा योगायोग जुळून आला आहे. येथील प्रत्येकाचीच जन्मतारीख 1 जानेवरी आहे. एकाच तारखेला सगळ्यांच्याच जन्माचा योग आधार कार्डांमुळे जुळून आला आहे. आधार कार्डावरील नमूद माहितीनुसार, खाटा गावातील मोहम्मद खानची जन्मतारीख 1 जानेवारी आहे. त्यांचे शेजारी अलफदीन यांचाही जन्म 1 तारेखाचा आहे. त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा जन्म 1 जानेवरी आहे.
 
आता हे झालं एका कुटुंबाचे. पण या गावातील 800 कुटुंबांतील प्रत्येक सदस्याच्या जन्म आधार कार्डावरील नोंदीनुसार 1 जानेवारीलाच झालेला आहे. ग्रामस्तानी आधार कार्ड तयार करताना आपली ओळखपत्रे आणि मतदान ओळखपत्रे सादर केली होती. तरीही आधार कार्ड नोंदणी करणार्‍या एजन्सीने हा गोंधळ घातला. आम्हाला विशेष ओळखपत्र क्रमांक दिला जाईल, असे सांगितले होते पण यात विशेष काय आहे? सगळ्यांची जन्मतारीख एकच छापली आहे, असे अलफदीन यांनी सांगितले.