Daily Horoscope
✕

#Boys/Girls Locker Room (Part 2)

Updated: शनिवार, 16 मे 2020 (13:35 IST)
 
कारण आजही समाजातला एक मोठा वर्ग मुलांचा अपराधाबद्दल आईलाच दोष देत असतो. पण मुलांचं संगोपन ही फक्त आईची जबाबदारी नसते आजची पिढी असं अमर्यादित का वागतेय हे शोधून काढण्याची जबाबदारी सगळ्यांवर आहे!!! आज आई-वडील दोघेही काळाप्रमाणे बदलायचा प्रयत्न करून राहिले आहे, पण मग असं काय आहे जे कमी पडतंय???? काय करणं गरजेचं आहे???
 
Boys locker room सारख्या घटना कोणत्या कारणांमुळे घटित होऊन राहिल्या आहे?? चला जाणण्याचा प्रयत्न करूया.....
 
1) स्वतंत्रता आणि स्वछंदता - माझ्या मते कोणत्याही गोष्टीची "अती" ही माती करणारी असते, मुलांना स्वतंत्रता देणं फार आवश्यक आहे पण कुठेतरी त्याचा गैरवापर तर होत नाहीये हे बघणं आवश्यक आहे, अती बांधून ठेवणं जसं चुकीचं आहे तसंच अती मोकळीक देणं पण गैर आहे,
दोन्ही गोष्टी बरोबर बॅलेस केल्या तर मात्र त्रास कमी होईल!!!
 
2) संवाद आणि वागणूक- या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाचा आहे , आपला मुलगा/मुलगी कसे वावरतात,इतरांशी बोलताना त्यांची वागणूक कशी असते?? स्वभावात दया, आदर , क्षमा हे गुण किती टक्के दिसताहेत, ह्या सगळ्या लहान-सहान गोष्टी जरी वाटल्या तरी महत्त्वाचा असतात, तसंच घरात असताना त्यांचे संवाद, व्यवहार कसा आहे?? डिप्रेशन किंवा टेन्शन मध्ये असताना आपण मोकळेपणाने बोलून त्यांना समज द्यायचा प्रयत्न केला पाहिजे!! असे काही विषय जे वाढत्या वयात बोलायची गरज आहे ते स्पष्टपणे सांगितले पाहिजे, ज्या कोणत्या विषयाला जाणून घ्यायची इच्छा असेल ते योग्य भाषेत प्रेमाने बोलले पाहिजे!!
या जगातील सगळी मुलं आई-वडिलांच्या छत्रछायेत स्वतःला सुरक्षित समजतात, मग आपण ही त्यांना अशीच जाणीव करून द्यायची, एक जादू ची झप्पी मारायची आणि मस्त गप्पा करायचा......
 
3) दोषी कोण मुलं की मुली - माझा मते दोष हा दोघांचाही आहे तुम्ही फक्त मुली आहात म्हणून यातून तुम्ही सेफ राहाल असं काही नाहीये, या घटनेत जितके मुलं दोषी आहेत तितक्याच मुली पण दोषी आहे, खरं पाहिलं तर ही घटना मुलगा/मुलगी नसून वाईट विचारांमुळे घडलेली आहे!!! दोघांनी एकमेकांविषयी आदर ठेवला नाही,आधुनिकीकरण हे या पिढीच्या डोक्यात शिरलेलं आहे, अनुकरण करण्याची पद्धत वाढत चाललीये, पण मला असं वाटतं की मुलं अथवा मुली या दोघांमध्ये  विशेष गुण असतात, आणि ते भिन्न असतात म्हणूनच सगळं व्यवस्थित असतं!!
 
आपल्या मुलींना हे शिकवायची फार गरज आहे की तुम्ही स्पर्धा नका निर्माण करू, तुमचं वेगळेपणच तुमचं वैशिष्ट्य आहे, तसंच मुलांना पण स्त्री विषयी आदर आणि प्रेम आलं पाहिजे, कोणालाही कोणाची बरोबरी करायची गरजच नाहीये!!! जर लहानपणापासून असे संस्कार होतील तर निश्चितच अश्या घटना घडणं थांबू शकतं. 
 
4) सोशल मीडिया आणि इंटरनेट चा वापर - हा मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, आपले मुलं किती वेळ सोशल मीडिया आणि इंटरनेट वापरतात?? या विषयावर जागरूक राहणं फार आवश्यक आहे, त्यांचा हालचालींवर लक्ष देणं, ते काय बघतात कसा वेळ घालवतात हे फार बारकाईने पाहिले पाहिजे, कारण आज तुम्ही साधा टीव्ही जरी लावला तरी 1 तासाच्या सीरियल मध्ये अनेकदा अश्या अश्लील जाहिराती येतात की आपल्यालाच लाज वाटू लागते, सिनेमा पाहायला जा तरी तेच, स्तरहीन संवाद , कॉमेडी चा नावावर असभ्यता असं सगळं 24 तास घरातच उपलब्ध आहेत, ते तर जाऊ द्या जर मोबाईल मध्ये "कँडी क्रश" किंवा एखादा गेम खेळायला जा तर आधी बायकांचे अश्लील फोटो दिसतात, Vice city, San Andreas हे अशे काही गेम आहे ज्याचात अश्लीलता तर आहेच पण मारकाट आणि रक्त हेच दिसतं, समोरच्याला जीवे मारणं हीच त्या गेमला जिंकायची पायरी आहे!!!
 
कालचंच उदाहरण सांगते माझ्या 12 वर्षाचा मुलाने मला प्रश्न केला "आई यौन शब्द कुठे वापरतात" मला वाटलं तो yawn विचारतोय पण तो म्हणे हिंदी मधलं "यौन" मी जरा वेळ थांबली मग त्याला विचारलं की तू कुठे वाचलं तर तो म्हणे की गेम खेळताना एड आली होती "असुरक्षित यौन संबंध"!!!!! 
 
तो लहान नाही म्हणून मी त्याला व्यवस्थित सांगू शकले पण  5 आणि 6 वर्षाचे चिमुकले जे अक्षर वाचन शिकून राहिले आहे त्याचं काय???? आज या मुलांचा हातात सतत मोबाईल असतो , पण याचे परिणाम किती घातक असू शकतात याची जाणीव असली पाहिजे, दिल्लीला घडलेली घटना अशातलाच प्रकार आहे!! या सगळ्या वर नियंत्रण करणं आता फार गरजेचं आहे ,वेळीच पाऊल उचलले पाहिजे, जवाबदार लोकांनी इंटरनेट आणि मीडिया साठी शासनात नियम आणले पाहिजे! पालकांनी पण या घटनेचा दोष मुलांवर न टाकता स्वतः जागरूक राहून या विषयाला हाताळलं पाहिजे!!!!
 
एक आई या नात्याने मी विनंती करते की या जाळ्यात आपल्या पाखरांना अडकू देऊ नका, मुलांना प्रेम, माणुसकी , आदर , चांगली वागणूक शिकवा, जास्तीत जास्त संवाद साधून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करा जेणेकरून त्यांना बाहेर कुणाच्या मदतीची गरज पडू नये, लहानपणापासूनच त्यांना सांगा की मुलगा आणि मुलगी आपसात प्रतिद्वंदी नसतात, कुणीही अश्लील भाषा आणि संवाद करेल तर कायद्याने त्यांना शिक्षा होऊ शकते!!
 
बलात्कार ही घटना नाही अपराध आहे आणि असल्या विषयांवर चर्चा करणं पण गुन्हा आहे, तुम्ही मुलं असा किंवा मुली अशे संवाद तुमच्या जीवनासाठी घातक आहे!!!!! 
 
Boys/Girls Locker Room या ग्रुप मध्ये घडलेली घटना ही लज्जास्पद आणि आक्षेपार्ह आहे!!!! अश्या घटना पुन्हा होऊ नये हा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केला पाहिजे.

Part 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
About Author
प्रगती गरे दाभोळकर
Writer.... Read More

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख